समाजवादी पक्षाचे (सपा) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनीही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर भाजपला मदत करत असल्याचा आरोप केला आहे. मुस्लीम मतं कॉंग्रेसपासून फोडण्यासाठी भाजपचा कट सुरु आहे, ज्यात प्रकाश आंबेडकरही साथ देत आहेत, असे अबू आझमी म्हणाले. एमआयएमने वंचितपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला त्यावर आझमी बोलत होते.
सपा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीसोबत असेल. मतांचे विभाजन होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे, असे आझमी म्हणाले. सपाकडून सात जागांची मागणी करण्यात आली आहे.
शिवाजीनगर, भिवंडी पूर्व, औरंगाबाद पूर्व, भायखळा ही जागा आम्हाला हवी आहे. भायखळ्यात मैत्रीपूर्ण लढत होईल. तीन जागांवर अजून चर्चा सुरु आहे, पण त्या मिळायला पाहिजे असा आमचा आग्रह नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
click and follow Indiaherald WhatsApp channel